ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कागल : शाहू साखर कारखान्यात सुरक्षा सप्ताहास प्रारंभ ; 4 मार्च ते 11 मार्च अखेर विविध उपक्रमांचे आयोजन

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यात सुरक्षा सप्ताहास प्रारंभ झाला. कारखान्याचे कार्यकारी संचालक जे.ए.चव्हाण यांच्या हस्ते ध्वज पूजन व सुरक्षा ध्वजारोहण करून या सप्ताहाचा प्रारंभ झाला. या ५३ व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने कारखान्यात आठवडाभर विविध स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

कार्यकारी संचालक जे.ए. चव्हाण म्हणाले, सुरक्षा सप्ताहपुरती सुरक्षितता न बाळगता ती कायमस्वरूपी बाळगावी. सुरक्षिततेचे नियम न पाळल्यामुळे होणाऱ्या दुर्घटनांमुळे कारखान्याचे व वैयक्तिक कर्मचाऱ्यांचेही नुकसान होते. हे टाळण्यासाठी सुरक्षिततेचे नियम सर्वांनी कायम पाळावेत.सेफ्टी ऑफिसर नितीन दरेकर यांनी सुरक्षिततेबाबत माहिती दिली.

यावेळी सुरक्षा बिंदू फलकाचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी अनावरण केले. सुरक्षा शपथ वाचन एस.बी.गावस्कर यांनी केले. यावेळी कर्मचाऱ्यांना सेफ्टी बॅच वितरणही केले.कारखाना आवारात सुरक्षिततेबाबत जनजागृतीपर बॅनर्स व पोस्टर्स लावली.स्वागत एच.आर.(मॅनेजर) बाजीराव पाटील यांनी केले.आभार चिफ इंजिनिअर बाळासाहेब बिरंजे यांनी मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks