ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा आरक्षणाच्या समर्थनात तारेवाडी येथे कॅण्डल मोर्चा.

नेसरी प्रतिनिधी

मराठा आरक्षण कायमस्वरूपी व तत्काळ मिळावे या न्याय मागणीसाठी मराठा क्रांतिकारक योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठबळ देण्यासाठी तारेवाडी येथे संध्याकाळच्या सुमारास कॅण्डल मोर्चा काढण्यात आला. गावातील मराठा बांधवांनी संपूर्ण गावभर फिरून मराठा आरक्षण बाबत जनजागृती केली.

मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. एक मराठा लाख मराठा एकच मिशन मराठा आरक्षण अशा विविध घोषणा देऊन गावातील परिसर दणदणून सोडला. जोपर्यंत हे सरकार जरांगे पाटील यांची मागणी मान्य करत नाही तोपर्यंत सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी करण्याची एकमताने ठरविण्यात आले या कॅण्डल मोर्चाचे आयोजन तारेवाडी चे उपसरपंच व कोल्हापूर जिल्हा संघ शाखा नेसरीचे शाखा अधिकारी प्रशांत तुरटे, युवा नेते हर्षद देसाई, यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.

यावेळी सरपंच विश्रांती नाईक, तंटामुक्त अध्यक्ष सटुप्पा देसाई, गोपाळ देसाई, अथर्व पाटील, सचिन लोहार, सुरेश तुरटे, दिनकर मेटकर, नारायण तुरटे, शंकर तुरटे, वैजनाथ पाळेकर, एकनाथ पाळेकर, भरत तुपुरवाडकर, वसंत तूपुरवाडकर, नारायण शिट्याळकर, नागोजी शिखरे, यल्लाप्पा पाळेकर,रामचंद्र खनगावकर, सचिन भारती, शिवाजी तुरटे, ग्रामपंचायत सदस्य भारती पाळेकर, सावित्री तुपूरवाडकर, पूजा गुरव, रेवती तुरटे, साजू खानगावकर, लक्ष्मी शिट्याळकर, कल्पना तुरटे, कोमल पाळेकर, व गावातील ग्रामपंचायत आजी-माजी पदाधिकारी महिला भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks