गोरगरिबांच्या कल्याणासाठीच माझी प्रयत्नांची पराकष्टा : पालकमंत्री हसन मुश्रीफ ; कागलमध्ये बांधकाम कामगारांना संसारोपयोगी भांडी संच, शिष्यवृत्ती व घर अनुदानाचे वाटप

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
गेल्या 30-35 वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत गोरगरीब जनताच माझी कवचकुंडले म्हणून सोबत राहिली. त्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी माझी प्रयत्नांची पराकष्टा आहे, असे भावनिक उद्गार वैद्यकीय शिक्षण विशेष सहाय्य मंत्री तथा; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.
कागलमध्ये श्री. शाहूनगर बेघर वसाहतीमध्ये आयोजित कार्यक्रमात मंत्री हसन मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. येथील बांधकाम कामगारांना गृहपयोगी भांडी संचाचे वितरण व दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत ३० लाख निधी खर्चाच्या सांस्कृतिक हॉलचा पायाभरणी श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. तसेच; यावेळी बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती व घर बांधकामासाठी अनुदानाच्या धनादेशांचेही वाटप झाले.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, येत्या काळात विविध मंडळे स्थापन करून महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या साडेचार कोटी कामगारांच्या जीवनमानात बदल घडवून आणण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. साडेचार कोटींपैकी फक्त ८० लाखावर कामगार नोंदीत कामगार आहेत. उर्वरीत शेत कामगार, कापड उद्योग कामगार, हॉटेल व्यवसायातील कामगार, ट्रक चालक, रिक्षा चालक तसेच इतर मोठ्या प्रमाणात काम करणाऱ्यांसाठी मंडळे स्थापन करून त्यांचेही जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करता येईल. भारत देश महासत्ता बनविण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी व देशाची अर्थव्यवस्था जगात पहिल्या तीनमधे आणण्यासाठी सर्वसामान्यांचे जीवनमान सुधारणे आवश्यक आहे. त्यासाठीच येत्या काळात कामगारांसाठी प्राधान्याने शासनाकडून विविध योजना आणण्याचे प्रयत्न करणार असल्याचे, ते यावेळी म्हणाले.
केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनांचे खरे जनक पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ आहेत. बांधकामांवर एक टक्का सेस लावून त्यांनी कामगारांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने सुखसमृद्धी आणली.
माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर म्हणाले, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कामाची नक्कल करून काहीजण आमदार झाल्याच्या आविर्भावात फिरत आहेत. परंतु; त्यासाठी पहाटे पाचपासून रात्री अकरा -बारापर्यंत जनतेची सेवा करावी लागते. गोरगरिबांच्या प्रश्नांची तळमळ आणि जाण असावी लागते. दुसऱ्यांनी केलेल्या कामाची नक्कल करून त्यांना हे उद्दिष्ट कधीच साध्य होणार नाही.
यावेळी गोकुळचे ज्येष्ठ संचालक युवराज पाटील (बापू), केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, श्रीनाथ समूहाचे चंद्रकांत गवळी, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, नवल बोते, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष नितीन दिंडे, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, सौरभ पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय चितारी, सागर गुरव, नूतन गाडेकर, अर्जुन नाईक, नवाज मुश्रीफ, संदीप भुरले, गौतम गाडेकर, बच्चन कांबळे, अशोक रावण, भिकाजी देवकर, अशोक वड्ड, भारत मोरे, उमेश पाटील, कुशाल कानडे, महेश कल्ले, संतोष पोवार, विजय दाभाडे, रोहित सोनुले, विनोद वाघेला, प्रथमेश जांभळे, विशाल बेनाडे, उदय पाटील, उत्तम पाटील, दीपक शिंदे, प्रकाश वाघमारे, सुभाष सुतार, बजरंग मिसाळ, संजय पोवार, बाळू सोनुले, सागर सोनुले, शब्बीर नगारजी, रामा सोनुले, सचिन कोरवी आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत प्रवीण सोनुले यांनी केले. प्रास्ताविक सतोष रजपूत यांनी केले. सूत्रसंचालन निशांत जाधव यांनी केले. आभार इम्तीयाज नंदगावे यांनी मानले.