छत्रपती शाहू महाराजांचा वारसा कृतीतून पुढे नेत आहोत : राजे समरजीतसिंह घाटगे ; कागलमध्ये बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये समाजाच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी अनेक आदर्शवत ध्येय धोरणं राबविली. त्यांच्या दुरदृष्टी धोरणांमुळेच दारिद्र्याच्या खाईत चाचपडत असलेल्या जनतेला मुख्य प्रवाहात आणण्याचे त्यांनी महतकृत्य केले. आम्ही ही आज त्यांच्याच आदर्शवत कर्तूत्वाचा वारसा प्रत्यक्ष कृतीतून पुढे नेत आहोत. असे प्रतिपादन भाजपचे नेते शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी केले.
कागल येथील दुधगंगा सांस्कृतिक भवन येथे महाराष्ट्र शासन कामगार विभागाच्या वतीने बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तूंच्या वाटप शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी 430 बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.प्रातिनिधिक स्वरूपात राजे समरजितसिंह घाटगे यांच्या शुभहस्ते येथील कविता रमेश गोसावी,भाग्यश्री शरद चौगुले ,कमल सागर शिंदे, सिंधुताई दत्तात्रय चव्हाण, कांचन प्रवीण माळकर या बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तुंचे संच देण्यात आले. तसेच बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचेही वाटपही करण्यात आले.
यावेळी क. सांगाव येथील ऋतुराज तानाजी पाटील यांची शासनाच्या बांधकाम विभागाकडे सहाय्यक अभियंता म्हणून निवड झाल्याने त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
श्री.घाटगे पुढे म्हणाले,आमच्यावर छ.शाहु महाराजांचे आदर्शवत संस्कार आहेत.त्या संस्कारांच्या पुण्याईतुनच आम्ही समाज उभारणीचे व्रत हाती घेतले आहे.शाहुंच्या जन्मभूमीला त्यांच्या विचारांचा खुप मोठा वारसा लाभलेला आहे.तो वारसा आज कागलची जनता अत्यंत नम्रपणे चालवित आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शाहू कारखान्याचे संचालक यशवंत उर्फ बाॅबी माने, सतिश पाटील, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, राजे बॅंकेचे संचालक नंदकुमार माळकर,रणजित पाटील, अरूण गुरव, सुरेश पाटील (मेट्रो हायटेक), बाळासो हेगडे यांच्यासह बांधकाम कामगार, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक राजे बॅंकेचे संचालक राजेंद्र जाधव यांनी केले.आभार गजानन माने यांनी मानले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन……
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते.मात्र नंतर सत्तेवर आलेल्या सरकारला सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकविता आले नाही.मात्र आता सत्तेत असलेल्या आमच्या महायुती सरकारने मराठा समाजाचे मागासलेपण सिध्द करून विशेष अधिवेशन घेऊन दहा टक्के आरक्षण देण्याचा कायदा केला.याबद्दल या कार्यक्रमात मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.