बोगस दाखला वापरून संगनमत रिटायरमेंट चे वर्ष ६२चे६५ करून घेतले ; पुणे येथील कार्यालयात पतित पावन संघटनेने घातला घेराव

आज दिनांक 27 फेब्रुवारी २०२४ रोजी डॉ. शैलेंद्र देवळाणकर संचालक (उच्च शिक्षण) महाराष्ट्र राज्य यांच्या पुणे येथील कार्यालयात पतित पावन संघटनेने घेराव घातला.श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर या संस्थेच्या दि न्यू कॉलेज, शिवाजी पेठ, कोल्हापूर येथील प्राचार्य व्ही . एम पाटील यांनी बोगस दाखला वापरून संगनमत करून रिटायरमेंट चे वर्ष ६२चे६५ करून घेतले. याच्या विरोधात संघटनेने अनेक दिवस सर्व ठिकाणी पाठपुरावा केला.
तत्कालीन तहसीलदार, करवीर यांनी दिलेला दाखला मा. उपविभागीय अधिकारी, करवीर यांनी रद्द केला.आज डॉ. देवळाणकर यांनी संघटनेला प्राचार्य पाटिल यांची सेवा तत्काळ समाप्त करण्याचे पत्र दिले.या वेळी पुणे शहर अध्यक्ष श्रीकांत शिळीमकर, पुणे शहर पालक मनोज नायर, पुणे शहर कार्याध्यक्ष गोकुळ शेलार, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख संजीव सलगर, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास मनेरे, पुणे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर साठे, पुणे शहर सरचिटणीस मनोज पवार, पुणे शहर संघटक शरद देशमुख, पुणे शहर चिटणीस राजाभाऊ बर्गे, कॉलेज विभाग प्रमुख तेजस पाबळे, कोथरूड विभाग प्रमुख सुनील मराठे, हराळे पाटील,शंकर बरके, शिवाजीनगर विभाग प्रमुख अक्षय बर्गे, सागर धिवार, दिपक परदेशी, शुभम परदेशी आदी अनेक जण उपस्थित होते.