श्री देव चव्हाटा संस्थेच्या वतीने शेतकरी अवजरांवर कर्ज वाटप

नेसरी प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
शिनोळी ता चंदगड येथे आज श्री देव चव्हाटा ब्रम्हलिंग सहकारी संस्था मर्यादित शिनोळी खुर्द यांच्या सहकार्यांतून संस्थेच्या मुख्य कार्यालय खांडेकर बिल्डींग येथे शिनोळी येथील प्रगतशील शेतकरी श्री यलापा रामु पाटील याना संस्थे कडून उषा कंपनी चे power trailor mini tractor ची चावी देताना संस्थेचे अध्यक्ष व शिवसेना उपजिल्हा प्रमुख मा. प्रभाकर खांडेकर साहेब यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले.
कमी कालावधीत संस्थेचा प्रगतीचा चढता आलेख पाहून समाधान वाटल्याचे मत अजित पेट्रोलियम चे मालक अजित खांडेकर यांनी power trailor पुजन करताना म्हटले.
तसेच प्रगतशील शेतकरी श्री दुर्गापा नागपा रामनकटी यांच्या शुभास्ते हार घालून पुजा करण्यात आले आहे.
यावेळी शिनोळी बुद्रुकचे शेतकरी मारूती बोकमुरकर ,संस्थेचे व्हा. चेअरमन मा.भरमा वैजू पाटील, हनुमान दुध संस्थेचे चेअरमन मा. परशराम मनोळकर, व्हा. चेअरमन व देवस्थान पंच. मा.निंगापा भावकू पाटील, तानाजीै खांडेकर ग्रा.प.स.व संचालक, शेतकरी रामु ओऊळकर, वैभव कृषी सेवा केंद्र चे मालक व संचालक नारायण पाटील, संचालक बाळकृष्ण तरवाळ,जोतिबाा करटे बाळू खांडेकर व सचिव राहुल मेणसे ,संजय पाटील, गुरु प्रसाद तरवाळ आदी उपस्थित होते.