कोल्हापूर : क्रांतीगुरु लहुजी (वस्ताद) प्रतिष्ठान तर्फे संत रोहिदास यांना अभिवादन

क्रांतीगुरु लहुजी (वस्ताद) प्रतिष्ठान तर्फे सुभाष नगर येथील ‘मन चंगा तो ,कठोती मे गंगा’ असा मूलमंत्र देणारे संत रोहिदास महाराज यांच्या पुतळ्यास जयंती निमित्ताने प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष राहुल गणेशाचार्य व महसूल चे संचालक गजानन कुरणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्रतिष्ठानचे कार्यकारणी सदस्य प्रशांत अवघडे यांनी रोहिदास यांचा जन्म वाराणसीजवळील सीर गोवरधनपूर गावात झाला आहे.त्यांचे जन्मस्थान श्री गुरु रविदास जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. त्यांची आई घुरबिनिया आणि त्यांचे वडील रघुराम. त्यांचे पालक चामड्याचे काम करीत.त्यांनी त्यांचे बहुतांश आयुष्य गंगा नदीच्या काठावर आध्यात्मिक अनुयायांमध्ये आणि सूफी संत, साधू व तपस्वी यांच्या सहवासात घालवले.
विविध भक्ती चळवळीतील कवयित्रींच्या प्राचीन जीवनांपैकी एक असलेला अनंतदास परचाईचा हा मजकूर रविदासच्या जन्माची ओळख करून देतो. असे मनोगत व्यक्त केले .यावेळी,प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवे,विराज साळवे,प्रथमेश लोखंडे, आदि उपस्थित होते.