उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात तीव्र आंदोलनाचे पतित पावन संघटनेने उगारले हत्यार

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
प्राचार्य श्री.व्ही.एम.पाटील यांना पाठीशी घालणाऱ्या उच्च शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात तीव्र आंदोलनाचे हत्यार पतित पावन संघटनेने उगारले आहे. आज कोल्हापूर येथे संघटनेची पदाधिकारी मीटिंग पार पडली. त्यामध्ये कोल्हापूर शहरातील न्यू कॉलेज चे प्राचार्य श्री. पाटील हे अपात्र ठरविण्यात आलेने त्यांना नोकरीतून तात्काळ कमी करण्याची मागणी सतत करूनही त्याकडे दुर्लक्ष करून श्री . पाटील यांना पाठीशी घालणाऱ्या उच्च शिक्षण मंत्री आणि शिक्षण संचालक यांच्या कार्यालयास पुणे येथे सोमवारी निवेदन देऊन बुधवारी उच्च शिक्षण मंत्री यांच्या विरोधात श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक कोथरूड पुणे येथे तीव्र आंदोलन करण्याचे सदर मीटिंग मध्ये सर्वानुमते ठरले.
या मीटिंग साठी पुणे येथील संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी सर्व पदाधिकारी यांना संघटनेच्या भावी वाटचाली बाबत मार्गदर्शन केले. तसेच विविध प्रकारे आंदोलने करून अन्याया विरुद्ध तीव्र लढा देणे बाबत मार्गदर्शन आणि सूचना केल्या .
सदर मीटिंग साठी पतितपावन संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख माननीय श्री.संजीव सलगर,
पुणे शहर अध्यक्ष श्रीकांत शिळीमकर, मनोज नायर, गोकुळ शेलार, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष माननीय श्री. आप्पासाहेब बन्नेनवर सर, माननीय जिल्हा कार्याध्यक्ष श्री नामदेवराव जाधव, जिल्हा सचिव माननीय श्री.दौलतराव मोहिते, जिल्हा संघटक श्री मधुकर मांडवकर व श्री गुंडप्पा काशीद, कोल्हापूर शहर अध्यक्ष श्री.अतुल कोईगडे , शहर कार्याध्यक्ष श्री गणेश मोरे शहर महिला उपाध्यक्ष अतिग्रे मॅडम शहर उपाध्यक्ष श्री मेघश्याम जगताप व श्री विनोद बामणकर , शहर संघटक श्री. प्रवीण पवार, इचलकरंजी शहराध्यक्ष श्री शेळके साहेब, श्री योगेश पवार व सर्व तालुक्याचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.