ताज्या बातम्या

सडोली खालसा येथील कै. द. रा. पाटील पतसंस्थेचा 13 टक्के लाभांश जाहीर

सावरवाडी प्रतिनिधी :

आमदार श्री. पी. एन. पाटील (सडोलीकर) यांच्या नेतृत्वाखाली व उद्योगपती  रविंद्र राजाराम पाटील (बापू) यांच्या मार्गदर्शनाने कार्यरत असलेल्या करवीर  तालुक्यातील सडोली खालसा येथील कै.. दत्तात्रय रामजी पाटील नागरी सह पत संस्थेची ३७ वी ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. 

या मध्ये संस्थेस गेल्या आर्थिक वर्षात २१ लाख ८५ हजार नफा झाल्याने सभासदांना १३ टक्के  लाभांश संस्थेचे संस्थापक  रविंद्र पाटील व  महिपती दिंडे यांनी सभेत जाहीर केला. संस्थेची वार्षिक उलाढाल रु १४ कोटी  इतकी असून ठेव सहा  कोटी रुपये  इतकी आहे. उपस्थितांचे स्वागत प्रकाश पाटील यांनी केले. प्रारंभी  आर्थिक वर्षात मयत झालेले सभासद ,संस्थेचे हितचिंतक याना श्रद्धांजली वाहून सभेचे कामकाज सुरू झाले. 

सभेचे अहवाल वाचन मॅनेजर मदन पाटील यांनी केले.मारुती देसाई यांनी संस्थेने सभासदांच्या हितासाठी राबवलेल्या उल्लेखनीय बाबींचा आढावा घेतला.

या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष  दिलीप पाटील संचालक शंकर पाटील,  सुभाष तिवारे, राजेंद्र मगदूम, विश्वास चव्हाण , तानाजी सुतार, हिंदुराव गोसावी, भिवाजी कांबळे, श्रीमती छाया पाटील, श्रीमती शोभा दिंडे, सदाशिव कोराणे, सतीश पाटील, सेवक प्रकाश पाटील, रमेश पाटील, विश्वास पाटील तसेच बहुसंख्य सभासद ऑनलाईन पद्धतीने हजर होते. 

संस्थेने व सेवकांनी कोरोना काळात सभासदाना व कोरोना पीडितांना मदत केली. दिलीप पाटील यांनी आभार  मानले. सभा खेळीमेळीत पार पडली . 

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks