मल्हारपेठ फाटा येथे एक हजार शिवभक्तांचा ” शिवज्योत स्वागत समारंभ ” उत्साहात

कळे -वार्ताहर अनिल सुतार
दरवर्षी शिवजयंती निमित्त धामणीखोऱ्यातील तरुणांकडून कळे-मल्हारपेठ फाटा येथे किल्ले पन्हाळगडावरून शिवज्योत घेऊन येणाऱ्या शिवभक्तांचा धामणीखोऱ्यातील तरुणांकडून शिवज्योत स्वागत समारंभ घेऊन विशेष सन्मान.
दरवर्षी प्रमाणे धामणीखोऱ्यातील विविध गावांतील काही सामाजिक कार्यकर्ते,शिवभक्त तरुणांकडून किल्ले पन्हाळगडावरून शिवज्योत घेऊन येणाऱ्या धामणीखोऱ्यातील तरुण मंडळांच्या शिवभक्तांना धामणीखोऱ्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळे-मल्हारपेठ फाटा येथे या कार्यकर्त्यांनी मानाचा फेटा व नारळ देऊन तसेच सोबत आलेल्या एक हजार शिवभक्तांना अल्पोपहार व चहाची सोय करण्यात आली होती. त्यामुळे पन्हाळगडावरून शिवज्योत घेऊन येणाऱ्या शिवभक्तांना या ठिकाणी काही क्षण विश्रांती मिळाली.
या उपक्रमाचे विशेष नियोजन सुदर्शन पाटील(सामाजिक कार्यकर्ते मल्हारपेठ) अमोल नवलव (सरपंच वाघूर्डे) विलास पाटील(सरपंच सुळे) दिपक पाटील (डे, सरपंच सुळे) एकनाथ नवलव (ग्रा पं. सदस्य वाघूर्डे) संभाजी पाटील(तात्या) संतोष नारकर,श्रीकांत गुरव,प्रशांत सातपुते यासह विविध सामाजिक कार्यकर्ते यांनी केले होते. या उपक्रमाचे धामणीखोऱ्यातील सर्व शिवभक्तांकडुन व नागरिकांतून कौतुक होत आहे.