ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कागल विधानसभा मतदारसंघातील आणखी १३०शाळांना ई लर्निंग संच पुरविणार : राजे समरजितसिंह घाटगे

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून आम्ही गेली दोन वर्ष कागल विधानसभा मतदारसंघातील शाळांना ई लर्निंग संच पुरवित आहोत.याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. आतापर्यंत पंचवीसहून अधिक शाळांना ई लर्निंग संच पुरवले आहेत.आता केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या सहकार्याने कागल-गडहिंग्लज-उत्तूर विधानसभा मतदारसंघातील आणखी१३० शाळांना ई लर्निंग संच देणार आहोत. अशी माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

शाहू ग्रुपचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे शिक्षणप्रेमी होते. आजचा विद्यार्थी देशाचे उद्याचे भवितव्य आहे. त्यामुळे त्यांचा प्राथमिक शिक्षणाचा पाया घट्ट झाला पाहिजे. यासाठी ते आग्रही होते. म्हणूनच आम्ही त्यांच्या नावे सुरु असलेल्या फाउंडेशन मार्फत ई लर्निंग संच गरजू शाळांना उपलब्ध करून देत आहोत. आता स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडून १३० किट उपलब्ध झाले आहेत.

ते गरजेप्रमाणे कागल,गडहिंग्लज व उत्तुर विभागासह कारखाना कार्यक्षेत्रातील करवीर तालुक्यातील शाळांना पुरविण्यात येणार आहेत.यापुढेही हा उपक्रम चालू ठेवणार असून जास्तीत जास्त शाळांना ई लर्निंग सुविधा पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks