मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी आरोग्यसेवा घराघरापर्यंत पोहोचवली : युवराज पाटील यांचे प्रतिपादन ; मुरगुडमधील दिव्यांग आरोग्य मेळाव्यात १३०० जणांची तपासणी

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी आरोग्यसेवा घराघरापर्यंत पोहोचविली, असे प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील यांनी केले. मुरगूडमध्ये आयोजित दिव्यांग मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून दिव्यांग आरोग्य मेळाव्याची सुरुवात झाली.
या सर्व दिव्यांग नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार कृत्रिम जयपुर हात -पाय, काठी, वॉकर, व्हीलचेअर, तीनचाकी सायकल, कमी ऐकू येणाऱ्यांसाठी श्रवणयंत्रे दिली जाणार आहेत. कागल, मुरगुड पाठोपाठ गडहिंग्लज, उत्तुरमध्येही दिव्यांग आरोग्य मेळावे होणार आहेत. तसेच; डोळ्याशी संबंधित तक्रारींच्या रुग्णांवर मोतीबिंदू, नेत्रचिकित्सा व सर्व प्रकारच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया श्री. टेके आय क्लीनिक अँड साईट सी केअरमध्ये केल्या जाणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने या मेळाव्यांचे आयोजन केले होते.
केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांची खरी ओळख ही “महाडॉक्टर” म्हणून आहे. गेली ३५ -४० वर्षे गोरगरिबांची आणि विशेषता: रुग्णांची सेवा अव्याहतपणे मोठ्या तळमळीने करीत आहेत.
गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ म्हणाले, नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने निरंतरपणे सेवाभावी कार्य सुरूच असते. विशेषता ; रुग्णसेवा आणि दिव्यांगसेवा या क्षेत्रामध्ये फाउंडेशनचे कार्य उल्लेखनीय आहे. कार्यकर्त्यांनी विविध प्रकारच्या रुग्णांसाठीचे लाभ त्यांच्या घराघरापर्यंत पोहोचवावेत.
यावेळी गोकुळचे संचालक युवराज पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन व गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ, रावसाहेब खिलारी, विकासराव पाटील, प्रवीणसिंह भोसले, रंगराव पाटील, देवानंद पाटील, मनोजभाऊ फराकटे, डी.एम चौगुले, दिग्विजय पाटील, रणजीत सूर्यवंशी, शशिकांत खोत, जयदीप पोवार, जगदीश पाटील, निलेश शिंदे, शामराव घाडगे, सुनील चौगुले, मयूर आवळेकर, राजू आमते, नितीन देवळे, संजय मोरबाळे, नामदेव भांदिगरे, जगन्नाथ पुजारी, चाचा चौगुले, सत्यजित चौगुले, अमित तोरसे, समाधान चौगुले, डाॅ. फारूक देसाई, सोहेल जमादार, रमाकांत धस आदि उपस्थित होते.
स्वागत रणजीत सूर्यवंशी यांनी केले. प्रास्ताविक विकास पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले. आभार दिगंबर परिट यांनी मानले.