ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोठी बातमी : उदयनराजे भोसले यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल

राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह 50 जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. साताऱ्यातील भुमिपूजनावरून बुधारी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात मोठा वाद उफाळला होता. उदयनराजे यांनी शिंवेंद्रराजे यांचा कार्यक्रम उधळून लावला होता. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर आता या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार यांच्या फिर्यादीनंतर उदयनराजे भोसले यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गर्दी जमवणे, दमदाटी आणि मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी 35 ओळखीचे आणि 15 अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी जीवे मारण्याची धमकी देऊन दोन लाख रुपये किमतीच्या साहित्याचे नुकसान केले असल्याचे शिवेंद्रराजे भोसले यांचे समर्थक विक्रम पवार यांनी तक्ररीत म्हटले आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर आता उदयनराजे भोसले यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते हे पहावे लागणार आहे.

नेमके प्रकरण काय ?

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या कार्यालयाचे भूमिपूजन हे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते होणार होते. यासाठी खिंडवाडी येथे मोठी तयारी करण्यात आली होती. शिवेंद्रराजे यांच्यासाठी कंटेनर ऑफिसची देखील व्यवस्था करण्यात आली होती. पण जिथे बाजारपेठच्या नव्या कार्यालयाचे भूमीपूजन होणार होते. ती जमीन उदयनराजे यांची असल्याचा दावा करण्यात आला. यावरुन हा वाद चांगलाच वाढला होता.

भूमिपूजनाचा कार्यक्रम हा बुधवारी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला होता. पण कार्यक्रम सुरु होण्याआधी उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी दाखल होत राडा केला. त्यांनी शिंवेद्रराजे भोसले यांचे कंटेनर ऑफिस उधळून लावले. त्यामुळे दोन्ही गट आमनेसामने आले. यावेळी पोलिसांमुळे वाद नियंत्रणात आला. यानंतर पोलिसांच्या सुरक्षेत शिवेंद्रराजे यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks