गडहिंग्लजच्या उपजिल्हा रुग्णालयाचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला ; नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाऊंडेशनकडून बोअरवेल मारून पाण्याचा प्रश्न निकाली

कोल्हापूर प्रतिनिधी : विजय मोरबाळे
गडहिंग्लजमधील शंभर कॉट हॉस्पिटल म्हणजेच उपजिल्हा रुग्णालय हे रुग्णांची वरदायिनीच जणू. गडहिंग्लजसह चंदगड आणि आजरा तालुक्यातील गावांसह वाड्यांसह या डोंगर-कपारीतील रूग्ण या रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. हॉस्पिटलचे विस्तारलेले स्वरूप व वाढत्या रुग्णसंख्येमुळे पाणीटंचाई नित्याचीच होती.
पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी महिनाभरापूर्वी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर दवाखान्याच्या परिसरात बोअरवेल मारून देण्याचा शब्द दिला होता. त्यांनी तो पाळलाही आणि या बोअरला भरपूर पाणीही लागले. या बोरवेलमुळे हॉस्पिटल आणि परिसरातील पिण्यासह इतर गरजेच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात निघाला आहे.
गडहिंग्लज शहरातील श्री. जडेयसिध्देश्वर मठाचे श्री. बसवकिरण स्वामीजी यांच्या उपस्थितीत नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनचे अध्यक्ष, गोकुळ दूध संघाचे संचालक नविदसाहेब मुश्रीफ यांनी बोरवेलचे पाणीपूजन करून लोकार्पण केले.
यावेळी किरणराव कदम, उदय जोशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. खोत सर, शर्मिली पोतदार, रेश्मा कांबळे, माधुरी शिंदे, महेश सलवादे, गुंडू पाटील, बसवराज खणगावे, नरेंद्र भद्रापुरे, सुरेश कोळकी, प्रशांत शिंदे, दीपक कुराडे, रश्मीराज देसाई, राहुल शिरकोळे, पृथ्वीराज पाटील, अशोक मेंडुले, उदय परीट आदी प्रमुखांसह डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.