मी मेलो तर मला तसंच यांच्या दारात नेऊन टाका : मनोज जरांगे पाटील

जालना :
मराठा आरक्षणाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मनोज जरांगे- पाटील यांनी पुन्हा आंतरावली सराटी येथे उपोषणाला सुरूवात केली.या उपोषणाचा पाचवा दिवस असून जरांगे यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे.
आता ‘मी जर मेलो तर मला तसंच त्यांच्या दारात नेऊन टाका.सलाईन लावायचं असेल तर आधी आरक्षणाची अंमलबजावणी केव्हा करणार हे सांगा’,अशी कठोर भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.तसेच‘ मराठा आरक्षणासाठी सरकारला धारेवर धरा’ असे आवाहन यावेळी जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले.सकाळी जरांगे-पाटील यांच्या नाकातून रक्तस्त्राव झाल्याचे सांगण्यात आले.
त्याचबरोबर मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपचार घेणार नसल्याची भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.शुक्रवारी जरांगे यांनी उपषणाला सुरूवात केली होती.मागील ५ दिवसांत त्यांनी अन्न, पाणी न घेतल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे.
त्यांची प्रकृती पाहण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे डॉ. विनोद चावरे यांना जरांगे यांच्या उपचारांसाठी पाठविण्यात आले होते. डॉ. चावरे यांनी बळजबरीने त्यांना सलाईन देखील लावले. मात्र मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपचार घेणार नसल्याच्या भूमिकेवर जरांगे ठाम आहेत.