मराठी पत्रकार संघाचा स्नेहमेळावा उत्साहात ; लवकरच अधिवेशन घेणार जिल्हाध्यक्ष धीरज रुकडे

कोल्हापूर प्रतिनिधी :
आज कोल्हापूर येथील शिवाजी उद्यमनगर येथील सामानी हॉल येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच आयोजित स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.
संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शिवाजी विद्यापीठाचे एम ए मास कम्युनिकेशन चे विभाग प्रमुख शिवाजी जाधव,ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार ओतारी हे प्रमुख वक्ते उपस्थित होते.
शिवाजी जाधव यांनी पत्रकारितेचे बदलते स्वरूप आणि पत्रकारांनी काळानुसार कसे बदलले पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले.तसेच नंदकुमार ओतारी यांनी व्यवस्था आणि पत्रकारांची अवस्था यावर आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली.
त्याच बरोबर जिल्हाध्यक्ष धीरज रुकडे यांनी संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या मार्गदर्शनानुसार संघाच्या आगामी काळातील वाटचालीबाबत सांगताना पत्रकार बांधवांच्या साठी ना नफा ना तोटा तत्वावर पुणे येथे सुरू झालेल्या फ्लॅट प्रकल्पाबाबत माहिती देऊन कोल्हापुरात असा प्रकल्प राबविणार असल्याची माहिती दिली.तसेच पत्रकारांनी आपल्या भविष्याबाबत डोळसपणे काम करत आपल्यासाठी कुटुंबकल्याण कारी संस्था उभा करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त करून लवकरच अशी संस्था उभी करून पत्रकार कुटुंबियांना आधार देणारी संस्था उदयास आणणार असल्याची माहिती दिली.
या स्नेहमेळाव्याला जिल्ह्यातून सर्व क्षेत्रातील पत्रकार बांधव उपस्थित राहिले होते.सर्वांचा नोंदणीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद पाहुन लवकरच अधिवेशन घेणार असल्याचे सांगितलं.तसेच नवनिर्वाचित पदाधिकारी यांची नियुक्ती पत्रे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये नवाब शेख यांची जिल्हा सचिव,जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील,विनोद नाझरे जिल्हा संघटक,नंदकुमार तेली शहर अध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली.या मेळाव्याला महिलांचा प्रतिसाद लक्षणीय होता.त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या काळात ही संघटना भरीव काम करणार असल्याचे दिसून येते.सदर कार्यक्रमाला युवा पत्रकार संघाचे शिवाजी शिंगे,अनिल म्हमाने,तसेच जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा कदम यांनी केले.