ताज्या बातम्यामहाराष्ट्र
चंदगड : शिरगाव शाळेच्या विद्यार्थ्यांना टी शर्ट वाटप

चंदगड प्रतिनिधी : पुंडलीक सुतार
मराठी विद्या मंदिर शिरगाव या शाळेच्या स्पोर्ट मध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या नावाचे टी-शर्ट सामाजिक कार्यकर्ते अनिल राव कांबळे यांच्या सौजन्याने मराठी विद्या मंदिर चे मुख्याध्यापक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली .
यावेळी मुख्याध्यापक जयवंत पवार यांनी स्वागत केले व उपक्रमाचे कौतुक केले.आणि यावेळी अनिल कांबळे व बंधू दीपक आंबे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .आणि मुलांना टी-शर्ट घालून कार्यक्रम संपन्न करण्यात आला यादरम्यान झालेला कांबळे यांनी मुलांनी जास्तीत जास्त प्रशस्त करून चांगले खेळ खेळावेत आणि आपल्या शाळेचे नाव उज्वला ची अपेक्षा व्यक्त केली .आभार कांबळे सर यांनी मानले यावेळी शीतल कुरणे सर्व शिक्षक व शालेय व्यवसथापन समिती अध्यक्ष मनोहर गावडे तसेच सर्व सदस्य व कार्यकर्ते हजर होते.