ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मोठी बातमी : मराठा आरक्षणासाठी १५ फेब्रुवारीला विधानसभेचं विशेष अधिवेशन

मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने सर्व अटी मान्य करत अधिसूचना काढत मराठा आरक्षण देण्यासंदर्भात ठोस आश्वासन दिलं होतं. आता मराठा आरक्षणासाठी १५ फेब्रुवारीला विधानसभेचं विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे.
अधिवेशनात मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडला जाणार आहे. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनात विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षण देण्याचं राज्य सरकारने आश्वासन दिलं आहे. तरीही येत्या १० फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत.
मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत कायमस्वरुपी टिकणारं आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.