ताज्या बातम्यामहाराष्ट्र
राधानगरी धरणातून शेतीसाठी सुरू असलेल्या पाण्याचा विसर्ग बंद

राधानगरी धरणातून शेतीसाठी सुरू असलेल्या पाण्याचा विसर्ग बुधवारी रात्री बंद करण्यात आला. यामुळे धरणातील पाणी आता केवळ पिण्यासाठी राखीव ठेवले जाणार आहे. धरणात 1.62 टीएमसी पाणी शिल्लक असून ते 15 दिवस पुरेल अशी स्थिती आहे. काळम्मावाडी धरणातही पाणीसाठ्यात घट होत असून आज पाणीसाठा 1.24 टीएमसीपर्यंत कमी झाला.राधानगरी धरणातील पाणी आता पिण्यासाठी राखीव ठेवले जाणार आहे.
याबाबत जशी मागणी होईल त्यानुसार निर्णय घेऊन पिण्यासाठी विसर्ग केला जाणार आहे. धरणातील पाणीसाठा 1.62 टीएमसी इतका शिल्लक आहे. यातून शेतीसाठी पाणी सोडायचे म्हटले तरी पंचगंगा खोर्याचा विचार करता हे पाणी पोहोचणार नाही, अशीच परिस्थिती आहे.