ताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी युवक मेळाव्यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन

कागल प्रतिनिधी :

दिनांक ११/०२/२०२४ बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी युवक मेळाव्यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजार समितीच्या पक्ष कार्यालयात करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून निवड झालेले विशाल वाकडकर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिंडे राष्ट्रवादी कोल्हापूर शहर युवक चे अध्यक्ष महेंद्र चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस हातकणंगले तालुका युवक अध्यक्ष आकाश कांबळे राष्ट्रवादी युवक आजरा शहराध्यक्ष आरिफ खेडेकर त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

या कार्यक्रमाचे स्वागत विजय काळे यांनी केले प्रास्ताविक शहराध्यक्ष महेंद्र चव्हाण यांनी केले त्यानंतर जिल्हा युवक अध्यक्ष नितीन दिंडे यांनी आपल्या मनोगतात जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा करण्याचे काम आदरणीय नामदार हसन मुश्रीफ यांनी केले आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या विविध पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी आपण पुण्यामध्ये घेऊन जाऊ असे आश्वासित केले.निरीक्षक विशाल वाकडकर यांनी मेळावा यशस्वी होणे विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आभार आकाश कांबळे यांनी मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks