मुरगूड पोलिसांकडून मोटरसायकल चोरट्यास अटक

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील मुरगुड पोलीस ठाण्यातील पोलिसांकडून मोटरसायकल चोरट्यास अटक केले.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुरगुड येथील रणजित बाजीराव सुर्यवंशी रा जवाहर रोड मुरगुड ता कागल यांच्या राहत्या घराच्या दारातील हिरो होंडा ॲक्टिवा मोटरसायकल एम एच ०९ सी.बी-८३३६ ही गाडी दि ३१ जानेवारी रोजी रात्री नऊ नंतर चोरीस गेली होती.
त्यानंतर फिर्यादी रणजित सुर्यवंशी पाटील यांनी दि ३ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवत गोपनीय माहितीच्या आधारे मुरगुड येथील जनावरांच्या बाजारात सदर गाडी घेऊन फिरत असलेला संशयित आरोपी अनिल देवाप्पा राठोड वय-२५ रा बैल जनावरांचा बाजार अड्डा मुरगुड याच्या पोलिसांनी मुद्देमालासह मुसक्या आवळल्या .
सदरची कारवाई मुरगुड पोलीस ठाण्याचे सपोनि शिवाजी करे,पो.हवालदार मधुकर शिंदे, संदीप ढेकळे, प्रशांत गोजारे, सचिन पारखे,पो.ना विजय माने, संतोष भांदिगरे यांनी केली.अशा प्रकारे अवघ्या दोन दिवसात मोटरसायकल चोरट्यास अटक केल्याप्रकरणी मुरगुड पोलीसांचे परिसरातुन कौतुक होत आहे.