चंदगड : माणगाव येथे लोकशाही गौरव सभेचे आयोजन

वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर दक्षिण यांच्या सहभागातून व कोल्हापूर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे यांच्या संकल्पनेतून २४ जानेवारी २०२४ रोजी पासून सुरू झालेली सुरू झालेली व कागल, भुदरगड, आजरा या तीन तालुक्यांचा झंजावात दौरा करून पोहोचलेली लोकशाही गौरव रथयात्रा गेली दोन दिवस चंदगड तालुक्यामध्ये पोहचली असून चंदगड तालुक्यातल्या दुसऱ्या दिवसांमध्ये माणगाव ता.चंदगड या गावी चंदगड तालुक्याच्या झंजावात दौऱ्याची सांगता लोकशाही गौरव सभेने झाली या सभेच्या प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.क्रांतीताई सावंत ,तक्रार निवारण समिती सदस्य व जिल्हा प्रभारी कोल्हापूर जिल्हा तसेच या सभेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून एडवोकेट सर्वजीत बनसोडे उपस्थित होते.
यावेळी बुद्ध विहार च्या प्रांगणात असलेल्या
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार कोल्हापूर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष माननीय दयानंद कांबळे यांच्या हस्ते घालण्यात आला व तेथून माणगाव आणि चंदगडच्या पंचक्रोशीतून या सभेसाठी प्रचंड जनसमुदाय उपस्थित झालेला होता त्यांच्या समवेत सभामंडपाच्या ठिकाणापर्यंत जिल्हा कमिटी व चंदगड तालुका कमिटी यांच्या समवेत पदयात्रा काढण्यात आली.
सभामंडपाच्या ठिकाणी माणगावच्या ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते अनुक्रमे छत्रपती शिवाजी राजे, छत्रपती संभाजी राजे, महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले, थोर क्रांतिकारक उमाजी नाईक, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे स्वागत मानगाव चे सुपुत्र यांनी केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभेचे अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष प्रा.विष्णू कार्वेकर यांनी केले तर आपले मनोगत जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे , जिल्हा महासचिव महादेव कांबळे व जिल्हा उपाध्यक्ष विलास कांबळे यांनी केले.
तसेच जिल्ह्याच्या जिल्हा प्रभारी डॉक्टर क्रांती ताई सावंत ह्या आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की एससी, एसटी, ओबीसी ,गरीब मराठा, मुस्लिम, आदिवासी, शेतकरी कामगार, महिला व विद्यार्थी यांना आपले ज्वलंत प्रश्न सोडवायचे असतील तर वंचित बहुजन आघाडी तथा श्रद्धेय एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये त्यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले.
त्यानंतर लोकशाही गौरव सभेचे खास आकर्षण, प्रमुख वक्ते एडवोकेट सर्वजीत बनसोडे यांच्या व्याख्यानाला सुरुवात झाली त्यांनी आपल्या भाषणामध्ये देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या राजकारणांचा आणि राजकीय नेत्यांचा खरपूस समाचार घेत हे भ्रष्ट नेते आपली राजकीय घराणेशाही शाबूत ठेवण्यासाठी व आपली सत्तेची खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी व सर्व सामान्य जनतेला लुटण्यासाठी भ्रष्टाचाराचा आरोप झालेला असताना सुद्धा एकत्र आलेली आहेत ह्या सगळ्या लबाड लांडग्यांना जर धडा शिकवायचा असेल तर वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही .
वंचितांच्या साठी काम करणारे एकमेव निष्कलंक स्वाभिमानी आणि अभ्यास नेतृत्व आहे ते म्हणजे श्रद्धेय एडवोकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर होय त्यामुळे होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभेमध्ये श्रद्धेय एडवोकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेबांच्या व वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी राहून त्यांना पाठबळ देण्याचे आवाहन त्यांनी केले
लोकशाही गौरव सांगता सभेचे नेटके आयोजन व संयोजन चंदगड तालुका अध्यक्ष प्रा. विष्णू कार्वेकर व माणगाव येथील स्थानिक वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले होते.
कोल्हापूर वरून कोल्हापूर उत्तर चे महासचिव कुंडलिक कांबळे ,कोल्हापूर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे जिल्हा महासचिव संतोष सुळकुडे , जिल्हा महासचिव महादेव कांबळे , जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन दुंडगेकर , जिल्हा उपाध्यक्ष विलास कांबळे सर, राधानगरी तालुका उपाध्यक्ष अमर कांबळे , कागल उपाध्यक्ष अतुल कांबळे , कागल आय टी प्रमुख तुषार कांबळे , गडहिंग्लज तालुका अध्यक्ष सचिन कांबळे , दिनेश खानापुरे तसेच माणगाव व चंदगडच्या पंचक्रोशीतून अमाप जनसमुदाय लोटला होता.