ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कागल तालुक्यातील सोनाळीत ३ लाखाचे दागिने लंपास

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सोनाळी ( ता. कागल ) येथे आनंदराव भाऊसो शेणवी यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून तिजोरीतील फोन त्यातील अडीच तोळ्याचे दागीने व रोकड असा तीन लाखाचा ऐवज चोरीस गेला. या चोरीसंदर्भात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे .
सोनाळीमधील वसाहतीमध्ये रहात असलेल्या आनंदराव भाऊसो शेणवी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून बेडरुम मधील तिजोरीचा उघडा दरवाजा उघडून त्यातील तिजोरीचे लॉकर मोडून त्यातील दीड तोळ्याचा सोन्याचा नेकलेस ‘ अर्धा तोळ्याच्या सोन्याच्या दोन अंगठ्या तसेच चार हजारची रोकड असा तीन लाखाचा ऐवज अज्ञात चोरटयांनी लंपास केला या चोरीची मुरगूड पोलिसात नोंद झाली आहे अधिक तपास मुरगूड पोलीस करीत आहेत .