आजरा पोलीस ठाण्याच्या नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी नागेश यमगर रुजू

आजरा प्रतिनिधी/पुंडलीक सुतार
आजरा पोलीस ठाणेकडे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी नागेश बाळू यमगर हे नुकतेच रुजू झाले असून त्यांचे मुळगाव कवठेमहांकाळ हे असून आतापर्यंत पोलीस खात्यात त्यांची 12 वर्षे इतकी सेवा झाली आहे.
त्यांनी गडचिरोली,मुंबई,सोलापूर,सांगोला,शाहूपुरी आदी पोलीस ठाणेत त्यांनी उत्कृष्ठ सेवा बजावली आहे.आजरा परिसरातील सर्व नागरिक अत्यंत चांगले असून पोलीस प्रशासनाला कायदा व सुव्यवस्था राखणेसाठी ईथुनपुढेही सहकार्य करावे असे यावेळी आमचे प्रतिनिधी पुंडलीक सुतार यांचेशी बोलताना सांगितले.
तसेच सर्व पोलीस पाटील यांनीही गावातील सर्व व्यक्तीशी चांगला सुसंवाद ठेवून पोलीस खातेसह प्रशासनाला सहकार्य करावे असे सांगितले सर्व जनतेला माझ्या स्टाफकडून सहकार्य राहील असे सांगितले यावेळी नूतन सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगर व नूतन पोलीस उपनिरीक्षक एस.व्ही. कळकुट्टे यांचा सत्कार पत्रकार पुंडलीक सुतार यांचे हस्ते झाला यावेळी शेळप येथील सामाजीक कार्यकर्ते सुरेश पाटील व पोलीस स्टाफ हजर होता.