बाळूमामांच्या आरती पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
करंजीवणे तालुका कागल येथील निवृत्ती शंकर मसवेकर यांनी लिहिलेल्या बाळूमामाच्या आरती पुस्तकाचे प्रकाशन माजी मंत्री आमदार विनय कोरे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. निवृत्ती मसवेकर यांनी लिहिलेल्या या आर्थिक पुस्तकामध्ये बाळूमामाच्या जीवन चरित्रावर आधारित पस्तीस आरत्यांचा समावेश आहे करंजवणी सारखे खेडेगावात राहून सुद्धा बाळूमामाचे चरित्र अभ्यासून बाळूमामाच्या प्रत्येक भागावर आरती तयार करण्याचे अलौकिक काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे श्रेष्ठ शिष्य सज्जन संत असं या पुस्तकाचे नामकरण करण्यात आले आहे.
या अगोदर त्यांनी बाळूमामाच्या चरित्रावर जी काही पुस्तके लिहिली ती बाळूमामाच्या भक्तामध्ये लोकप्रिय झाली आहेत त्यामुळे त्याने आरती संग्रह लिहिण्याचा मानस व्यक्त केला व बाळूमामाच्या आशीर्वादाने तो पूर्णही केला आहे. बाळूमामाच्या जीवन चरित्रावर आधारित मोजक्याच आरत्या आजपर्यंत प्रसिद्ध झाल्या होत्या पण तब्बल 35 आरती असणारा हा पुस्तक ग्रंथ आल्याने वाचकांना पुन्हा एकदा बाळूमामाचे आरतीतुन जीवन अभ्यासता येणार आहे.
याबाबत निवृत्ती मसवेकर म्हणाले, अतिशय खडतर जीवन जगणाऱ्या बाळूमामा नी मेंढरांचे पालन केले सेवा केली सेवार्थ रहा असा संदेश दिला मीही तेच केले असून ज्याने अशी सेवा केली त्या बाळूमामाच्या जीवनावर आरती पुस्तक तयार करून ते प्रकाशित करण्यामध्ये यश मिळाले हाच मला बाळूमामा ने दिलेला आशीर्वाद आहे.