“ओपन” जेऊ देईना आणि “क्लोज” झोपू देई ना. कळे पोलिसांचा आशीर्वाद! मटका फोफावतोय ; तरुणाई व कुटुंबे कंगाल! मालक मात्र मालामाल.; कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधिक्षकांनी आता तरी लक्ष घालण्याची गरज

कळे -वार्ताहर : अनिल सुतार
कळे,बाजारभोगावसह संपुर्ण परिसर व काटेभोगाव येथे कळे पोलिसांच्या आशीर्वादावर मटका फोफावत असून तरुणाई कंगाल तर मालक मालामाल असे चित्र दिसून येत असून.कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक आता तरी लक्ष घालणार का?अशी सर्व सामान्यांकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.
मटक्याच्या आकड्यावर नशीब आजमावून झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेक गोरगरिबांचे संसार उध्वस्त होत आहेत. लपून छपून चालणारा मटका आता कळे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांच्या आशिर्वादाने बाजारभोगाव , काटेभोगाव व कळे सह परिसरात जोरदार सुरू आहे.जुगारी माणसांची प्रवृती अशी असते की आपण जी हार पत्करली आहे. ती उदया नक्कीच भरून येईल.
म्हणून तो पुन्हा मटक्याच्या नादात जे काही आहे-नाही ते सर्वच गमावून बसतो. या मटका खेळणाऱ्यांच्या संसाराची होणारी ही राख रांगोळी कोण थांबवणार ? हप्ता घेणाऱ्या अधिकाऱ्यांनो संसाराची राखरांगोळी होत असलेल्या ‘ त्या ‘ मातेचा,पत्नीचा व पोराबाळांचा तळतळाट तुम्ही हप्ता घेवून तुमच्या वाटयाला का घेताय ? असा सवाल सामान्यांतून व्यक्त होत आहे.
कळे, बाजारभोगाव व पुनाळ परिसरात मटक्याच्या खेळात पाच ते सहा लाख रुपयांची उलाढाल होत असतांना हप्ते खाणारे मालामाल होत आहेत, तर मटक्याच्या आकड्यात तरुणाई कंगाल होत आहे. रोजरोसपणे मटक्याची दुकाने थाटणाऱ्यांना अभय कोणाचे असा प्रश्न परिसरातील नागरिक करीत आहेत.
यात उधारी, उसनवारी लागलेल्या आकड्यातून बेबाकी करण्याचा नवा फंडा बुकींकडून चालत आहे. वेळेवर हप्ते जात असल्याने कारवाई करणे तर दुरच पण कोणी या विरोधात तक्रार केली, तर तक्रारदाचाच कायदेशीर बंदोबस्त करण्याचा कार्यक्रम येथील पोलिसांकडून केला जातो. काहीही करा पण मटका बंद झाला नाही पाहिजे” याची काळजी घेण्याची सक्त ताकीद संबंधीत बुकींना पोलिसांकडून मिळाल्याची चर्चाही जोरात सुरू आहे.
“ओपन जेऊ देईना आणि क्लोज झोपू देई ना” अशी अवस्था मटके वाल्यांची असून कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम मटका सुरू असून त्यात अनेकांच्या संसाराची राख रांगोळी होत आहे. मटक्याविरुद्ध पोलीस कारवाई करीत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे काही परिसरात चार ते पाच मुख्य एजंट असल्याची माहिती असून हे एजंट पोलिसांच्या आशीर्वादावर वसुली करत आहेत अशा अशाप्रकारे “तेरी भी चूप व मेरी भी चूप” अशा पद्धतीने कारभार सुरू आहे कल्याण आणि मुंबई मटक्याने गोरगरिबांचे संसार उध्वस्त होत असताना लोकांनी मटका खेळू नये असा उपदेश पोलीस खात्याकडून दिला जात आहे.
खेळणारे खेळतात, घेणारे घेतात तेव्हा तुमच्या बापाचे काय जाते अशी शेखी मिरवली जात आहे. मटका प्रकरणी पोलीस बघ्याची भूमिका घेत असून परिसरात अवैध धंदे वाढत असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालू असलेला मटका व्यवसाय आता थांबला पाहिजे. या दृष्टीने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कायमचीच कठोर कारवाई करावी, अशी जनतेतून मागणी होत आहे.