गारगोटी येथे गणेश मूर्ती विकणाऱ्या परप्रांतीया विरोधात स्थानिक कुंभार व्यावसायिक आक्रमक; पहिल्यांदा स्थानिक लोकांना व्यवसायासाठी प्राधान्य मग बाकीच्या लोकांना : युवराज येडूरे

गारगोटी :
गारगोटी मध्ये परप्रांतीय लोक श्री गणेश मूर्ती विकण्यासाठी गारगोटी मध्ये स्टॉल मांडले आहेत. त्यांना मनसेचे युवराज येडूरे व स्थानिक कुंभार व्यावसायिकांनी स्टॉल बंद करायला लावले आहेत. स्थानिक कुंभार व्यावसायिकांवर या परप्रांतीय लोकांमुळे भविष्यात मोठी अडचण निर्माण होऊ शकते, त्यामुळे त्यांचा बंदोबस्त आत्ताच केला पाहिजे, असे मत शेणगांव चे ग्रामपंचायत सदस्य भैरवनाथ कुंभार यांनी मांडले.
जर दुकाने बंद केली नाहीत तर गणेशाच्या मूर्ती उचलून कुंभारांना दिल्या जातील, असा सज्जड दम देखील परप्रांतीय मूर्ती विक्रेत्यांना देण्यात आला.
स्थानिक कुंभारांचा व्यवसाय वाढला पाहिजे व त्यांना न्याय मिळाला पाहिजे या दृष्टीकोनातून हा प्रयत्न करत असल्याचे येडूरे यांनी सांगितले. यावेळी शेणगांव चे ग्रामपंचायत सदस्य व मूर्ती व्यावसायिक भैरवनाथ कुंभार, लक्ष्मण कुंभार, भरत कुंभार, सुरेश कुंभार, निलेश कुंभार, साताप्पा कुंभार आदी उपस्थित होते.