ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापूर वादग्रस्त लक्षतीर्थ मदरसा प्रकरण ; पोलीस आणि प्रशासनाच्या मध्यस्थीने कोल्हापूर जिल्ह्यातील तणाव निवळला

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
वादग्रस्त ठरलेल्या येथील लक्षतीर्थ वसाहत मधील मदरशाचे बांधकाम गुरुवारी मुस्लिम समाजाने स्वतःहून उतरून घेतले. हि वास्तू जमीनदोस्त झाल्याने तणाव निवळला आहे.पण ही वस्तू स्थिती पाहता पोलीस प्रशासनाची तीन दिवस तारेवरची कसं चालू होती. एक बाजू ला हिंदुत्ववादी संघटना तर दुसऱ्या बाजूला मुस्लिम संघटना गेल्या पंचवीस वर्षापासून स्व-मालकीच्या जागेवर असलेले मदरशाचे बांधकाम बेकादेशीर असल्याची तक्रार काही हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती.
त्याआधारे कोल्हापूर महापालिकेच्या नगररचना विभागाच्या वतीने कागदपत्रे अपुरी असल्याच्या कारणा वरून बेकायदेशीर ठरवत पाडण्याचा ठरवले होते. पण त्यास मुस्लिम समाजाने विरोध केला. तर हे बांधकाम पडले पाहिजे यासाठी हिंदुत्ववादी संघटनांची प्रतिआंदोलन केल्याने दिवसभर तणावाचे वातावरण होते.