ताज्या बातम्यामहाराष्ट्र
गोरगरीब आणि सामान्यांना दिलासा देणाऱ्या अनेक निर्णयांची अर्थसंकल्पात तरतूद ; केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाबाबत पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांची प्रतिक्रिया

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी देशाचा अर्थसंकल्प जाहीर केला. लोकसभेच्या निवडणुका असल्यामुळे त्यांनी वोट आणि अकाउंट म्हणजेच फक्त खर्चापुरताच अर्थसंकल्प जाहीर केला. गोरगरीब आणि सामान्यांना दिलासा देणाऱ्या अनेक निर्णयांची अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे. याबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिक्रियेशी मी सहमत आहे.
या अर्थसंकल्पामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेचा अतिशय चांगला आणि योग्य ते पालन करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी घेतलेला आहे. अर्थव्यवस्थेमध्ये शिस्त आणलेली आहे. या अर्थसंकल्पाचे आम्ही स्वागत करीत आहोत.