ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत मदरसावर अतिक्रमण पथकाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात केली कारवाई, ; प्रचंड तणाव घोषणाबाजी केल्यानं मोठा गोंधळ

कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत इथल्या आलिफ अंजुमन मदरसावर कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये आज सकाळी कारवाईचा बडगा उगारला. मात्र, या परिसरातील मुस्लिम समाजातील नागरिक आणि महिलांनी या कारवाईला प्रचंड विरोध केला. संबंधित नागरिकांनी शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके तसंच पोलिसांबरोबर हुज्जत घातली. त्यामुळं मोठा तणाव निर्माण झाला आहे.
यावेळी नागरिकांनी घोषणाबाजी केल्यानं मोठा गोंधळ उडाला.मात्र, पोलिसांनी शांतता राखण्याचं आवाहन केल आहे . अजूनही लक्षतीर्थ वसाहत मध्ये तणावाच वातावरण आहे. यावेळी लक्षतीर्थ वसाहत परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवून मदरसाकडे जाणारे रोड बॅरिकेट लावून बंद केलेले आहेत.