ताज्या बातम्यामहाराष्ट्र
नेसरी : आगीत घर जळून खाक झालेल्या सुतार कुटुंबाला मदतीचा हात

नेसरी/पुंडलीक सुतार
नेसरी ता.गडहिंग्लज येथील युवराज सुतार यांचे राहते घर लागलेल्या आगीत आठवडाभरापूर्वी जळून खाक झाले यामुळे या कुटुंबाचे फार मोठे नुकसान झाले या घटनेची दखल घेऊन जनसेवा समाजसेवक नरसु शिंदे सामाजिक संस्था व त्यांच्या सहकारी यांनी दखल घेऊन सदर कुटुंबाला जीवनावश्यक वस्तू देऊन मदत केली व कुटुंबाला हातभार लावण्याचा प्रयत्न केला.
तर संस्थेच्या वतीने सदर कुटुंबाला माणुसकीच्या नात्याने दानशूर व्यक्तींनी हातभार लावून सहकार्य करावे असेही आवाहन यावेळी करण्यात आले.यावेळी बाळासाहेब नावलगी, पत्रकार रवींद्र हिडदुग्गी,आनंद सुतार,विष्णू पाटील,अशोक भालेकर,सुधाकर घोरपडे,भिकाजी गोंधळी,अमोल बागडी, चंद्रकांत संकपाळ,आदी उपस्थित होते.