निधन वार्ता
उत्साळी येथील ह.भ.प. गोविंद आपटेकर यांचे निधन

चंदगड प्रतिनिधी :
उत्साळी ता चंदगड येथील ह भ प गोविंद आपा आपटेकर वय 72 वर्ष यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा स्वभाव मनमीळावू,प्रेमळ असा होता. पंढरपूरच्या पांडुरंगाचे ते निस्सीम असे भक्त होते. पंढरपूरला त्यांनी बऱ्याच वेळा पायी वारी केल्या होत्या. तसेच वै. प. पु. ह. भ. प. महादेवकाका दळवी यांचे ते शिष्य होते. त्यांच्या अचानक जाण्याने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,सून व नातवंडे असा परिवार आहे.