ताज्या बातम्यामहाराष्ट्र
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या दोघांची शिवाजी विद्यापीठ व्हॉलीबॉल संघात निवड

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या ओंकार लोकरे व गजानन गोधडे यांची २६ व्या क्रीडा महोत्सव स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली आहे . हे खेळाडू चंद्रपूर येथील शिवाजी महाराज विद्यापिठात होणाऱ्या क्रीडा महोत्सव व्हॉलीबॉल स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत .
त्यांना व्हॉलीबॉल प्रशिक्षक महादेव कानकेकर , शारीरिक शिक्षण संचालक शिवाजी पोवार, प्रशिक्षक संभाजी मांगले, अजित गोधडे श्रावण कळांद्रे यांचे मार्गदर्शन लाभले . या खेळाडूंना संस्थेचे सचिव मा. खा.संजयदादा मंडलिक ,कार्याध्यक्ष ॲड वीरेंद्र मंडलिक , संस्थेचे अध्यक्ष गजाननराव गंगापुरे ,कार्यवाह अण्णासाहेब थोरवत ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .शिवाजी होडगे यांचे प्रोत्साहन लाभले .