ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुरगुड शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शहरात खळबळ

मुरगुड प्रतिनिधी :
मुरगुड ता.कागल येथील बाजारपेठेत राहणाऱ्या अमर गिरी यांच्या पत्नी व दोन मुलींना डेंग्यूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर डेंग्यूने डोके वर काढल्यामुळे मुरगूडकरांची चिंता वाढली आहे.
पत्नी व मोठी मुलगी निपाणी येथे, तर लहान मुलगी मुरगूड येथे
खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. डेंग्यूच्या रुग्णांची मुरगूड पालिका प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे.
नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी आरोग्य विभागास त्याबाबत सूचना दिल्या आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पाटील म्हणाले, गिरी यांच्या घराशेजारील सर्व परिसराचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.