शिंदेवाडी मॅराथॉन स्पर्धेत मळगेचा ओंकार सावरतकर तर मुलींमध्ये अर्जुनवाडाची गौरी वाघरे प्रथम ; स्पर्धेला स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शिंदेवाडी मॅराथॉन स्पर्धेत मळगेचा ओंकार सावरतकर तर मुलींमध्ये अर्जुनवाडाची गौरी वाघरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
शिंदेवाडी ता.कागल येथील युवा स्पोर्ट्स यांच्यावतीने नवरात्रोत्सव निमित्ताने घेण्यात आलेल्या १६०० मीटर मॅरेथॉन स्पर्धेत १५४ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेचा अन्य निकाल असा :
1600 मीटर पुरुष खुला गटात प्रथम क्रमांक ओंकार संजय सावरतकर(मळगे), द्वितीय क्रमांक विशाल संभाजी चव्हाण (वारणानगर) , तृतीय क्रमांक साहिल संजय कुदळे (सरवडे)यांनी पटकावले.
तर मुलींमध्ये गौरी नेताजी वाघरे(अर्जुनवाडा)प्रथम क्रमांक, गौरी कय्यापा पुजारी (सौंदलगा) द्वितीय क्रमांक ,येलवा म्हाळू बानशे (सौंदलगा)तृतीय क्रमांक यांनी पटकावले.
या मॅराथॉन स्पर्धेचा शुभारंभ मुरगुडचे पोलीस उपनिरीक्षक राहुल वाघमारे यांनी केला. यावेळी मयूर आंगज,राहुल खराडे,अजित मोरबाळे , गणेश तोडकर, विनायक खराडे,रणजित कदम,विनायक वंदूरे ,साताप्पा शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या स्पर्धला स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्यामुळे स्पर्धा उत्साहात पार पडली.विजेत्या स्पर्धकांना प्रमूख पाहुण्यांचा हस्ते रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले.
स्वागत ओंकार खराडे यांनी तर सूत्रसंचालन ओंकार शिंदे यांनी केले , तर आभार नाना शिंदे यांनी मानले.
स्पर्धेचे आयोजन युवा स्पोर्ट्सचे विनायक शिंदे,स्वप्नील ढेरे ,नितीन शिंदे,राहुल शिंदे ,आदित्य शिंदे, आकाश शिंदे, सुरज शिंदे , वैभव खराडे, पृथ्वीराज शिंदे,समर्थ शिंदे,हर्षद शिंदे,केतन खराडे, व्यंकटेश गिरी ,तुषार पाटील आदीनी केले.