ताज्या बातम्यामहाराष्ट्र

चांगले काम करा ; महाविकास आघाडीचे सरकार तुमच्यासोबत उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी नवनिर्वाचित आमदार जयश्रीताई जाधव यांना दिल्या शुभेच्छा

प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे

कोल्हापूर उत्तरच्या नवनिर्वाचित आमदार जयश्रीताई जाधव यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेतली. जनतेने तुमच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी चांगले काम करा, महाविकास आघाडीचे सरकार तुमच्यासोबत आहे, असा विश्वास देत अजितदादांनी जयश्रीताई जाधव यांचे अभिनंदन केले.

तसेच कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही देत जयश्रीताईंच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचेही त्यांनी अभिनंदन केले.

यावेळी ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ना. उदय सामंत, मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार, गृह राज्यमंत्री ना. सतेज पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks