मुरगुड : सायन्स अकॅडमी मुरगूड ची पहिल्याच प्रयत्नात यशस्वी गरुडझेप

मुरगुड प्रतिनिधी :
मुरगूड ता. कागल येथील सायन्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये 9 वी ची विद्यार्थीनी कु. सृष्टी संदीप पाटील हिने मुख्याध्यापक संघामार्फत घेण्यात आलेल्या विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत मुदाळ केन्द्रात पहिला तर कोल्हापूर जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला. अकॅडमीचा 9 वी चा विद्यार्थी कु. अंकुश उत्तम पाटील याची बायजु व डिस्कवरी यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत महाराष्ट्रातून अंतिम फेरीसाठी निवड झालेली आहे तसेच 7 वी चा विद्यार्थी कु. कौस्तुभ संतोष कुडाळकर याने इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड परीक्षेत सुवर्णपदक प्राप्त केले आहे. सदर अकॅडमी मध्ये 5 वी ते 10 वी या वर्गांचे गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयांचे मार्गदर्शन केले जाते. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सायन्स अकॅडमीचे मार्गदर्शक शिक्षक महेश पाटील सर, पंकज सारंग सर, एम. एन. पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले.