कागल अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे तथा बाळ महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल संस्थांनचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे तथा बाळ महाराज यांच्या जयंतीनिमित्त कागल येथे अभिवादन केले. कागल बसस्थानक परिसरातील त्यांच्या पुतळ्यास शाहू ग्रुप चे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राजे बँकेचे संचालक चेअरमन एम पी पाटील,संचालक राजेंद्र जाधव, प्रकाश पाटील नंदकुमार माळकर, आप्पासो भोसले,उमेश सावंत,विजय बोगाळे ,बाबगोंडा पाटील, बाळू नाईक,मारुती मदारे, प्रमोद कदम, श्रीकांत कोरवी,आदी उपस्थित होते.
श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना येथील प्रधान कार्यालयातील त्यांच्या प्रतिमेचे पूजन कारखान्याचे संचालक यशवंत उर्फ बॉबी माने यांच्या हस्ते झाले,यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांच्यासह संचालक सचिन मगदूम, सतीश पाटील, युवराज पसारे,सतीश माळी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, माजी सेक्रेटरी एस ए कांबळे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.