ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुयोग कुंभार ठरला राज्यस्तरीय उत्कृष्ट फोटोग्राफर पुरस्काराचा मानकरी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

परिवर्तन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, इचलकरंजी, अखिल दशावतारी पारंपारिक लोककला अकादमी व एशिया बुक रेकॉर्ड आयोजित केलेल्या महाराणी ताराराणी भोसले राष्ट्रीय विचार सामाजिक संमेलनाचा उत्कृष्ट फोटोग्राफर पुरस्कार २०२२ चा‌ मानकरी सुयोग कुंभार यांना प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातुन काम करणाऱ्या अवलियांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. फोटोग्राफी क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट फोटोग्राफर पुरस्कार देवून सुयोग कुंभार यांना उत्कृष्ट अभिनेते मा. आनंद काळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,लांडगा मेडल देऊन गौरविण्यात आले.

यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते आनंद काळे शिवकन्या मा.अर्चना पारते राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र मा. श्री .गंगाधर व्हनकोटी ,मा़ श्री संदीप राक्षे चित्रपट निर्माता अध्यक्ष निवड समिती ,मा.श्री. बाळकृष्ण गोरे इ.मान्यवर उपस्थित होते.

सुयोगच्या कार्यासाठी ,त्याच्या फोटोग्राफी या क्षेत्रातील कौशल्यासाठी त्यांचे वडील जोतिराम कुंभार व आई सविता कुंभार यांनी सर्वाधिक कष्ट घेतले आहे. सुयोग च्या या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks