कागल : साके येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखेचे उदघाट्न

प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे
संघर्षनायक मा.ना.रामदासजी आठवले राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) तथा केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्री भारत सरकार व सौ. सिमाताई आठवले (राष्ट्रीय अध्यक्षा रिपाइं महिला आघाडी) यांचे हात बळकट करण्यासाठी व पक्ष संघटन विस्तार वाढी साठी रमेश कांबळे (RB) तालुका नेते रिपाइं कागल यांच्या पुढाकाराने व जिल्हा नेते सतिश माळगे यांच्या नेतृत्वात मोजे साके,ता.कागल येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या शाखेचे सतिश माळगे यांच्या हस्ते फित कापून दिमाखात उदघाट्न झाले. या शाखेचे पदाधिकारी म्हणून शाखाअध्यक्ष – सतिश कांबळे (बच्चन), उपाध्यक्ष तुषार कांबळे तर सचिव म्हणून रोहित कांबळे यांची निवड करण्यात झाली आहें. यावेळी रमेश कांबळे तालुका नेते रिपाइं कागल, कुंडलिक कांबळे राधानगरी तालुका अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), रिपाइं कोल्हापूर जिल्हा नेते सतिश माळगे , प्रदीप ढाले, प्रविण कांबळे, माधुरी कांबळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. रिपब्लिकन पक्ष राजकारणासोबतच लोकशाहीच्या मूल्यांची जपणूक व अंमलबजावणीसाठी, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा व प्रसंगी रस्त्यावरची लढाई लढून सर्वसामान्य जनतेस न्याय मिळवून देणारा पक्ष आहें असे आपल्या मनोगतात मत मांडले. या कार्यक्रमास प्रविण आजरेकर, शंकर दाभाडे, शंकर कांबळे, तात्यासो कांबळे, विकास कांबळे, राहुल कांबळे, कुमार कांबळे, गौतम कांबळे, प्रकाश कांबळे, संजय कांबळे, अर्जुन चौगले, सुषमा कांबळे, मीना कांबळे, कुसुम कांबळे, माहिलावर्गासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक राहुल कांबळे यांनी केले. विनायक सातूसे यांनी उत्कृष्ट निवेदकाची भूमिका पार पाडली. शेवटी आभार गौतम कांबळे यांनी मानून या कार्यक्रमाची सांगता झाली.