ताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रेमप्रकरणातून निढोरीच्या युवकाला बेदम मारहाण ; तिघांवर गुन्हा नोंद

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

कागल तालुक्यातील निढोरी येथील सौरभ भरमा कांबळे (वय २४) याला कुरणी येथे काही तरुणांनी बेदम मारहाण केली आहे. सौरभ मुरगूड नाका येथे चहा पीत असताना बळजबरीने गाडीत घालून गावाबाहेर नेत जबर मारहाण केली आहे. यामध्ये सौरभ गंभीर जखमी झाला असून कोल्हापुरातील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी मुरगूड येथील प्रशांत नामदेव करडे तर कुरणी येथील शिवप्रसाद शहाजी पाटील व शुभम जीवन पाटील या तिघांवर गुन्हा नोंद झाला आहे. हा प्रकार प्रेमप्रकरणातून घडला आहे.याबाबत ची फिर्याद विजय कांबळे यांनी मुरगूड पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, निढोरीचा सौरभ गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास हॉटेलमध्ये चहा घेत होता. यावेळी वरील तिघे त्या ठिकाणी आले. त्यांनी सौरभला शिवीगाळ केली व गाडीत बळजबरीने घालून त्याला कुरणी गावच्या बाहेर असलेल्या कालव्याच्या रस्त्यावरील शेडमध्ये नेले. त्या ठिकाणी सौरभला अर्ध नग्न अवस्थेत लोखंडी रॉडने मारहाण केली. रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूंचे समर्थक पोलिस स्टेशनमध्ये थांबून होते.याबाबत अधिक तपास मुरगूड पोलीस करत आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks