ताज्या बातम्यामहाराष्ट्र

बहिरेश्वर येथे न्यु इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना ई-पिक नोंदणी चे प्रशिक्षण  संपन्न

सावरवाडी प्रतिनिधी :

करवीर तालुक्यातील बहिरेश्वर  येथील न्यु इंग्लिश स्कूल व महसुल विभाग बहिरेश्वर म्हारुळ यांच्यातर्फ शासनाच्या ई पीक निहाय नोंदणी चे मोबाईल अँप द्वारे प्रशिक्षण संपन्न झाले.  

यावेळी बोलतांना तलाठी सुवर्णा भोईर म्हणाल्या शासनाच्या वतीने सुरु असलेल्या शेती पिकांची मोबाईल द्वारे होणारी ई पीक नोंदणी महत्वाची आहे . डिझीटल इंडिया द्वारे शेतीचे तंत्रज्ञान बदलले आहे  ई पींकनिहाय नोंदणीचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.

प्रारंभी मार्गदर्शन करतांना  माजी सैनिक व कोतवाल सुरेश दिंडे म्हणाले भारत हा कृषिप्रधान देश असून कृषि क्षेत्रात नवनवीन बदल येत आहेत . त्याचा नव्या पिढीने उपयोग केला पाहिजे ई पीक नोंदणी ही काळाची गरज आहे . ई पींक पीक निहाय नोंदणीचे तंत्रज्ञान अवगत होणे गरजेचे आहे.

यावेळी मुख्याद्यापक गुरव ,यांनी मनोगत व्यक्त केले . प्रारंभी एकनाथ चौगले ,यांनी प्रास्ताविक केले शेवटी एस के पाटील यांनी आभार मानले . शाळेच्या विद्यार्थी – विद्यार्थांनी उपस्थितीत होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks