कागलच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा सौ. माणिक माळी व माजी उपनगराध्यक्ष भाजपात ; आ मुश्रीफाना होम ग्राऊंडवर मोठा धक्का ; कागलमध्ये राष्ट्रवादीस खिंडार

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कागल शहराच्या नगराध्यक्षा सौ. माणिक माळी व त्यांचे पती कागलचे माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आ. मुश्रीफाना होम ग्राऊंडवर हा मोठा धक्का मानला जात आहे, प्रवेशामुळे कागलमध्ये राष्ट्रवादीस मोठे खिंडार पडले आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी त्यांचे भाजपमध्ये आपल्या निवासस्थानी त्यांचे स्वागत केले.
या प्रवेशानंतर माळी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शाहू कारखान्याच्या प्रांगणातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज व स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्यास पुष्पाहार घालून अभिवादन केले.
नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुश्रीफ गटातून राजे गटात केलेला प्रवेश म्हणजे होमग्राऊंडवर मुश्रीफ गटाला मोठा धक्का आहे.याआधी मुश्रीफ गटातून राजे गटात माजी नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष आनंदा पसारे यांनीही त्यांच्याअसंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे.
सौ.माणिक माळी या पाच वर्षांपूर्वी कागल नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्षा म्हणून माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या गटातून नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या आहेत.
यावेळी बोलताना समर्जीतसिंह घाटगे म्हणाले,
कागलच्या शाश्वत विकासाचे स्व. राजेंचे स्वप्न पूर्ण करण्याच्या परिवर्तनाच्या लढाईस सौ .माळीवहिनी व रमेश माळी यांच्या प्रवेशाने बळ मिळाले आहे. नगरपालिकेत त्या नामधारी नगराध्यक्षा होत्या. प्रत्यक्षात सत्ताकेंद्र कारभारी मंडळींच्या हातात होते.आमच्याकडे कोणत्याही अटी आणि शर्तीशिवाय मोठ्या संख्येने कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. याचा आमदारांना त्रास होत आहे.
कागलमध्ये हम करे सो कायदा ही प्रवृत्ती आणखी किती दिवस चालू द्यायची असा सवालही त्यांनी उपस्थित करून कागलमध्ये ही हुकुमशाही मोडून काढून पारदर्शी दृष्टीकोण डोळ्यासमोर ठेऊन कागलमध्ये परिवर्तन करून स्वराज्याचा भगवा फडकवूया.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी म्हणाले,मी मूळ स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांचा कार्यकर्ता.त्यामुळे मी आज माझ्या मूळ कुटुंबात आलो आहे असे वाटते.
कागल हे छ शाहू महाराज यांच्या विचाराचे घडले पाहिजे, त्यासाठी राजे समर्जीतसिंह प्रयत्न शील आहेत.समाजभिमुख विकासाच्या माध्यमातून कागल च्या वैभवात भर घालण्यासाठी आम्ही स्वगृही आलेलो आहोत
पूर्वीच्या गटात माझी कुचंबणा होत होती. छ शाहू महाराजांचे नाव घ्यावयाचे आणि त्यांच्या जनक घराण्याविषयी अवमानकारी वक्तव्ये त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होत असताना नेते गप्प बसायचे हे आम्हाला खटकत होते. राजेंच्या नेतृत्वाखाली कागलमध्ये स्वराज्य उभा करण्यासाठी व कागलचा शाश्वत विकास करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कोणत्याही अटी शर्तींशिवाय प्रवेश केला आहे.यावेळी रोहित माळी यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी राजे विरेंद्रसिंह घाटगे,माजी उपनगराध्यक्ष आनंदा पसारे, राहुल माळी, राजश्री वरुटे, जयश्री खोत, नितीन नासिपुडे, तानाजी माळी, गजानन माळी, महादेव नाकीर, शिवाजी माळी, सातापा माळी, पुंडलिक माळी, सुरेश माळी, बाळासो बरकाळे, महेश माळी, ओंकार माळी आदी उपस्थित होते.