कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का ! संदीप देसाई यांनी केला भाजपा प्रवेश

प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे
कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप देसाई यांनी केला भाजपमध्ये प्रवेश चंद्रकांतदादांनी त्यांना भाजपमध्ये प्रवेश करताच देसाई यांची भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड करून त्यांना निवडीचे पत्रही देण्यात आले.
संदीप देसाई यांनी काही वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. मन रमत नसल्याने मात्र आता त्यांनी स्वगृही परत येण्याचा निर्णय घेतला. संदीप देसाई यांच्या पक्ष प्रवेशा बद्दल चंद्रकांत दादा पाटील म्हणाले देसाई हे स्वगृही परतण्याचा आनंद झाला.
सत्यजित कदम यांना निवडून आणण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा असेल असे म्हणाले. त्यावेळी देसाई म्हणाले की मी नेहमीच राष्ट्रीय विचाराचे काम करतो त्यामुळेच माझा जास्त भाजपकडे कल होता. कोल्हापुरात भारतीय जनता पक्ष वाढीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याचे म्हणाले.