कोल्हापूर जिल्ह्यातील पालकांनी सुरू असलेल्या RTE मोफत केंद्राचा लाभ घ्यावा.

कोल्हापूर प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या समता दूत प्रकल्पामार्फत RTE प्रवेश प्रक्रिया 2022-23 करिता मोफत केंद्र सुरू करण्यात आले आहे RTE अर्थात शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 या कायद्याअंतर्गत पहिली ते आठवी पर्यंत च्या मुलांना खाजगी इंग्रजी माध्यम व सेमी माध्यमाच्या शाळेत मोफत शिक्षण मिळवून देते RTE मध्ये साधारण चार गटांना मोफत प्रवेश दिला जातो. त्यांची वर्गीकरण SC/ST/OBC/NT/VJNT इतर मागास प्रवर्ग
2/एक मागास ज्यामध्ये ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1लाख रुपये पेक्षा कमी आहे. असे सर्व जाती धर्मातील पालक.
3/अनाथ बालक जी मुले अनाथ आहेत जी अनाथाश्रमात राहतात ते किंवा ज्यांना दत्तक घेतले आहे.
4/दिव्यांग अथवा एड्स बाधित ज्या मुलांना 40 टक्के अपंगत्व आहे असे अथवा जे एड्स बाधित आहेत असे विद्यार्थी.
या प्रक्रियेत खालील प्रकारची आवश्यक कागदपत्रे लागतात.
1/पाल्याचा जन्माचा दाखला
2/सामाजिक मागास असलेल्या साठी पाल्याच्या वडिलांचा जातीचा दाखला.
3/आर्थिक मागास असलेल्या साठी पाल्यांचा वडिलांचा एक लाखांच्या आतील उत्पन्नाचा दाखला.
4/रहिवासी पुरावा आधार कार्ड लाईट बिल या पैकी कोणतीही एक हे नसेल तर रजिस्टर रेंट एग्रीमेंट
जर वरीलपैकी आपण कोणत्याही एका गटात येत असेल व तुम्हाला RTE अंतर्गत खाजगी शाळेत मोफत प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला RTE बाबत सर्व माहिती ही मोफत दिली जाईल त्याकरिता आपण आमच्या खालील समता दूत यांना संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे यांनी केले.
कोल्हापूर क्षेत्र – आशा रावण
मो. 9689262563
शिरोळ तालुका – सुनंदा मेटकर मो.7709114286
कागल तालुका – किरण चौगुले मो. 8605456288
करवीर तालुका – प्रतिभा सावंत मो.7840924378