एनसीसी विभागांतर्गत मंडलिक महाविद्यालयात छत्रपती राजर्षी शाहूमहाराज जन्म शताब्दी निमित्त व्याख्यान

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय हे पुरोगामी विचारांचा वारसा जपणारे एक विचारपीठ मानले जाते. हा वारसा एनसीसी विभागानेही पुढे चालू ठेवला आहे. याची प्रचीती नुकत्याच पार पडलेल्या छात्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जन्म शताब्दी निमित्ताने आयोजित व्याख्यानाने आली. प्रथम दहा मान्यवरांच्या हस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर मुरगुड परिसरातील ज्येष्ठ पत्रकार श्री. सुभाष देसाई यांनी *छत्रपती राजर्षी शाहू महाराज व त्यांची कारकीर्द* या विषयावर सखोलपणे व मुद्देसूद मांडणी केली. यामध्ये शाहू महाराजांचा जन्म, त्यांची शैक्षणिक वाटचाल, छंद, दूरदृष्टी, सामाजिक, सांस्कृतिक क्रीडा, कला क्षेत्रातील मोलाचे योगदान इत्यादी अनेक बाबींवर प्रकाशझोत टाकला. शाहूंच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे प्रसंग त्यांनी अधोरेखित केले. त्यामध्ये शाहू महाराज बडोदा येथे शिक्षण घेत असताना तेथील मित्राच्या स्मरणार्थ त्यांनी सध्या कोल्हापूरचा *भाऊसिंगजी रोड* असे रोड चे नामकरण केले. जातीभेद निर्मूलनासाठी त्यांनी स्वतः च्या मुलीचे लग्न धनगर समाजातील मुलाशी लावून दिले. या व अशा अनेक घटना देसाई यांनी आजच्या तरुण विद्यार्थी विद्यार्थिनींना सांगितल्या. संपूर्ण दादोबा मंडलिक सभागृह विद्यार्थ्यांनी भरले होते. वीज पुरवठा अचानक खंडित होऊन सुद्धा सभागृहातील उष्ण वातावरणात स्तब्ध शांतता होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. फराकटे यांनी केले. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कुंभार, उपप्राचार्य डॉ. पाटील एनसीसी प्रमुख लेफ्टनंट विनोद प्रधान, तसेच महाविद्यालयाचा सरवस स्टाफ सर्व विभागाचे विद्यार्थी विद्यार्थिनी व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.