कमल पाटील,बाजीराव ढोले,शहाजी पाटील,दिनकर प्रभावळकर,शंकर बाबर,रंगराव तोरस्कर,शिवाजीराव धुरे यांना जीवन गौरव तर अनिल सारंग यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार जाहीर ; राजे विक्रमसिंहजी घाटगेंच्या जयंतीनिमित्त नवोदितादेवी घाटगे यांनी आदर्श शिक्षक पुरस्कारांची केली घोषणा

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कमल पाटील (आरदाळ), बाजीराव ढोले, शहाजी पाटील (दोघेही गोरंबे ),दिनकर प्रभावळकर, शंकर बाबर (दोघेही कागल), शिवाजीराव धुरे (उत्तूर )रंगराव तोरस्कर (नागाव),यांना जीवन गौरव तर सिद्धनेर्ली येथील अनिल सारंग यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला.
शाहू उद्योग समूहाचे संस्थापक आणि सहकार क्षेत्रातील द्रष्टे नेतृत्व दिवंगत राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७७ व्या जयंतीचे औचित्य साधून या पुरस्कारांची घोषणा राजे बँकेच्या अध्यक्षा सौ.नवोदितादेवी घाटगे यांनी केली.
शिक्षण व समाजकारण क्षेत्रात प्रेरणादायी कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्याच्या हेतूने राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन आणि राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने “राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार” देण्यात येतात.
या पुरस्काराचा उद्देश शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करून इतरांना प्रेरणा देणे असे असून, शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका व शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात झाली आहे.
यावर्षी कागल,करवीर,आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील एकूण ६९ शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्राथमिक विभागातील २९, माध्यमिक विभागातील ३०,जीवन गौरव पुरस्कारासाठी ८ व शिक्षकेत्तर सेवेतील २ मानकरी यांचा समावेश आहे.
या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र आणि कोल्हापुरी फेटा असे असून, शिक्षकांचा सहपत्नीक/सहपती सत्कार समारंभपूर्वक करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम लवकरच निश्चित करण्यात येणार असून, त्याची तारीख व ठिकाण पुरस्कारप्राप्त शिक्षकांना स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे.
पुरस्कार प्राप्त मानकरी यांची विभागवार नावे अशी आहेत.
प्राथमिक विभाग..
जयश्री पाटील (कणेरी), ज्योती चव्हाण (कागल), कमल शिंदे (व्हन्नुर), विजय पोवार (सिद्धनेर्ली), शितल माळी( म्हाकवे), छाया लोखंडे (शेंडूर) संजय कुदळे (उंदरवाडी), प्रतिभा खामकर( बाचणी), विष्णू पाटील( बेलवळे खुर्द)संदीप महेकर (पालकरवाडी ),पांडुरंग पाटील( बेलवळे खुर्द),शशिकांत कुंभार( कौलगे ),पुंडलिक कुंभार( करड्याळ), विलास कुंभार (हिरलगे), सुरेखा मोटे (करंबळी ),शिवाजी कुदळे (बेलेवाडी हुबळगी), रूपाली कुंभार (भादवण), आनंदा भादवणकर(भादवण), नामदेव शिंदे( वझरे), सुप्रिया पाटील( कागल), भाग्यश्री मुजुमदार( कागल), श्वेता मोडक (कोल्हापूर), अनिल बोटे (मुरगुड), अमित कांबळे(उत्तूर), मारुती राजमाने( गडहिंग्लज), अनिता पाटील( कणेरी), संध्या कुलकर्णी (कागल), पांडुरंग पाटील (मळगे खुर्द), चैताली चौगुले (चिमगाव).
माध्यमिक विभाग…
शिवाजी अनावरे (गडहिंग्लज ), संजय मगदूम (एकोंडी), अनंतराव फराकटे (चौंडाळ), राजेंद्र कुंभार (मडिलगे), बाळासो कांबळे (मौजे सांगाव),मधुकर घराळ(सिद्धनेर्ली), लक्ष्मण पाटील (केनवडे), एकनाथ चौगुले (गोरंबे), वसंत चौगुले (मळगे खुर्द), संजय कांबळे (सावर्डे बुद्रुक), विठ्ठल सडोलकर (बाचणी), बाबुराव पाटील(बेलवळे बुद्रुक), संजय कांबळे (कौलगे), संदीप देवडकर( सोनगे), उमाजी पाटील (सुरूपली), श्रीकांत कुंभार( सेनापती कापशी), उत्तम पाटील( कडगाव), अजित चौगुले( भादवणवाडी), मीनाक्षी मुरतुले, उषा साठे,दिपाली लोखंडे, गजानन हेगडे( सर्व कागल), अमित भोई,दत्तात्रय लोखंडे, श्रीकृष्ण बोंडगे, सुरेखा पाटील (सर्व मुरगूड), दिगंबर कुंभार (उत्तुर), अर्जुन हराडे (गडहिंग्लज ) अमित शिंत्रे (कनेरी), सुजाता सासमिले( सुळकुड)
शिक्षकेतर कर्मचारी विभाग…
सुरज हरेल, कुमार कांबळे( दोघेही कागल).