राष्ट्रीय लोकजागृतीचे 11 डिसेंबर रोजी आयोजन

कोल्हापूर :
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे निर्देशानुसार राष्ट्रीय लोक अदालत चे आयोजन शनिवार दिनांक 11/12/2019 रोजी श्रीमती व्ही. व्ही. जोशी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक न्यायालय, सहकार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय आणि शाळा न्यायाधिकरण येथे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच जिल्हा व सत्र न्यायालय कोल्हापूर व जिल्ह्यातील सर्व तालुका येथे सदर राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील तडजोडीचा पात्र व प्रलंबित वाद तसेच दाखल पूर्व प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत. त्याचबरोबर न्यायालयातील प्रलंबित तडजोडी पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, 138 एन आय प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बँकेशी संबंधित प्रकरणे, तसेच वाघ दाखल पूर्व प्रकरणांमध्ये टेलिफोन मोबाईल कंपनी संबंधित वाद, महाराष्ट्र राज्य वीज वितरण प्रकरणे इत्यादी प्रकरणांचा समावेश सदर राष्ट्रीय लोक अदालत मध्ये असणार आहे.
तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा, अशी विनंती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कोल्हापूर यांचे मार्फत करण्यात आली आहे.