मुरगूड नगरपालिकेस राष्ट्रीय पुरस्कार ; मुरगूडचा पुन्हा दिल्लीत सन्मान होणार

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नगरपरिषदेला दुसऱ्यांदा राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. पुन्हा एकदा दिल्लीत सन्मान होणार असून, या योजनेचा ब्रँड अॅम्बॅसिडर असल्याचा सार्थ अभिमान आहे, असे उद्गार अॅड. वीरेंद्र मंडलिक यांनी काढले. नगरपरिषदेस जाहीर झालेल्या पुरस्काराबाबत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, या पुरस्काराबद्दल कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
स्वच्छ सर्वेक्षण २०२२अंतर्गत मुरगूड नगरपरिषदेने विविध घटकामध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. यामुळे पाच कोटींचे बक्षीस मिळणार आहे. खा. संजय मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश मिळवता आले. परिषदेतील कर्मचाऱ्यांनी स्वच्छ सर्वेक्षण योजनेंतर्गत राबवलेली मोहीम पदाचा, हुद्याचा विचार न करता आपलं गाव आपली जबाबदारी, या भावनेतून झोकून देऊन योगदान दिल्याचे फलित, असेही ते म्हणाले.