मुरगुड मध्ये हसनसो मुश्रीफ यांच्या वाढदिवसा निमित्ताने 30 एप्रिल पासून नामदार चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड ता.कागल येथील मुरगूड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोल्हापूर जिल्हा व शहर कुस्ती असोसिएशन यांच्या मान्यतेने नामदार चषक मॅटवरील खुल्या व विविध वजनी गटातील कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले आहे. स्पर्धा ३० एप्रिल ते २ मे अखेर आयोजित केल्याची माहिती संयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येणाऱ्या या स्पर्धा कन्या शाळेच्या पटांगणावर होणार आहेत. कुस्ती स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी अडीच लाख, द्वितीय क्रमांकसाठी आणि तृतीय क्रमांकांसाठी अनुक्रमे दोन लाख व एक लाख रुपये तर चतुर्थ क्रमांकासाठी ५१ हजार रुपये व सर्व विजेत्यांना चषक बक्षीस दिले जाणार आहेत. स्पर्धा तीन दिवस-रात्र प्रकाशझोतात चालणार आहेत. यासाठी भव्य प्रेक्षक गॅलरी उभारली जाणार आहे.
या स्पर्धा ६५ किलो , ६०किलो , ५७ किलो, ५२ किलो , ४६ किलो , ४२किलो , ३५ किलो , ३० किलो , २५ किलो , २२ किलो या गटांत होणार असून, विजेत्यांना रोख रकमेच्या बक्षिसासह चषक बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन ३० एप्रिल रोजी मान्यवरांच्या हस्ते, तर बक्षीस वितरण 2 मे रोजी सायंकाळी होणार आहे.
यावेळी वस्ताद अण्णासो गोधडे,राजू आमते, नामदेव भांदिगरे, रणजित मगदूम, नंदकुमार खराडे,लक्ष्मण मेंडके,सचिन मगदूम, सुरेश शिंदे,रणजीत मगदूम,अमित तोरसे,सत्यजित चौगले, बाळकृष्ण मंडलिक,राजू चौगले, सुनील कांबळे, अमर नाधवडेकर, अविनाश परीट,नितीन कांबळे, अमर सारंग, उमेश गुरव, निवृत्ती हासबे,संग्राम भोसले आदी उपस्थिती होते.
डॉ. सुनील चौगले यांनी स्वागत केले. रणजित सूर्यवंशी-पाटील यांनी प्रास्ताविक केले.तर युवराज सूर्यवंशी यांनी आभार मानले.